Muknayak:
आत्मनिर्भर
प्रधानमंत्रीकहते है 'आत्मनिर्भर हो जाओ...: आत्मनिर्भर प्रधानमंत्री कहते है 'आत्मनिर्भर हो जाओ'। कुछ दिन पहले राष्ट्र को सम्बोधित करते हुए उन्होंने ऐसा कहा । जाहि...
Muknayak
काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले. नाही जगी कोणी मुकीयांची जाण, सार्थक लाजून नव्हे हित. - संत तुकाराम
Wednesday, May 20, 2020
आत्मनिर्भर
प्रधानमंत्री
कहते है 'आत्मनिर्भर हो जाओ'। कुछ दिन पहले
राष्ट्र को सम्बोधित करते हुए उन्होंने ऐसा कहा । जाहिर है, ये अपने घर वापस जाने के
लिए पैदल हजारो किलोमीटर का रास्ता चलने वाले मजदूरों के साथ साथ उन देशवासियों के
लिए भी लागु है जो आज घर में बैठे है । जो रस्ते पर है उनके लिए ये शायद ज्यादा लागु
है । मुझे एक किस्सा याद आ गया ।
१९३५ में जब गुजरात के 'कविता' गांव के अछूतों पर,
गांव के सवर्णो ने बहिष्कार डाल दिया; इसलिए क्यों की वहाँ के अछूतों ने अपने बच्चों
को सवर्ण बच्चों के साथ स्कूल भेजा । पहलेसेही बहिष्कृत जिंदगी जीने वाले अछूतों पर
इस बहिष्कार से, जो एखाद दूसरी सुविधा पहलेसे सवर्णो से मिलती थी, वो भी बंद हो गयी
। इस घुटन के चलते अछूतों ने तब गांधीजी से मदत की याचना की । महात्मा ने बजाय सवर्णो
को कुछ कहे अछूतों से कहा,
" आप लोगो
को आत्मनिर्भर होना चाहिए। आपका आत्मसम्मान
अगर इस गांव में नहीं हो रहा, तो आपको चाहिए की आप ये गांव छोड़ कर कही ओर बस जाएँ। जब आदमी रोजीरोटी के लिए अपना गांव छोड़ सकता है
तो आत्मसम्मान के लिए तो छोड़ ही सकता है। मैं उन सारे सवर्णो से, जो अछूत प्रथा खत्म
होनी चाहिए ऐसे विचार रखते है, आवाहन करता हु की वो कविता के अछूतो को स्थलांतर में
मदत करे ।"
-(Reference –
What congress and Gandhi have done to the Untouchables Chapter X page No. 264
to 266)
ऐसे
महात्मावों की हमारे देश में कमी नहीं है; ये हमारा बड़ी उपलब्धि है । आज मजदूरों की
कोई ठोस सहायता करने के बजाय उन्हें आत्मनिर्भर बनाने की सलाह देना उनके जले पे नमक
के आलावा और कुछ नहीं है । ये तो वही बात हो गयी की किसी गंभीर रूप से बीमार व्यक्ति
को जो अभी मरने की कगार पर हो, उसे डॉक्टरी इलाज देने के बजाय, उसे कहना की तुम अगर
दौड़ लगावोगे तो बच जावोगे ....।
Friday, May 15, 2020
फुले - आंबेडकरी
आंदोलनाचा तिढा !
फुले
आंबेडकरी विचारधारा आणि फुले आंबेडकरी दृष्टिकोन, समाजाच्या अश्या एका आदर्शाची मांडणी
करतात ज्यात स्वातंत्र, समता आणि बंधुत्व प्रस्थापित आहे.
एक
बाजू अशी आहे की स्वातंत्र, समता आणि बंधुत्व प्रत्येकात रुजवणे जवळ जवळ अशक्य आहे.
प्रत्येकात रुजवण्याचा हट्ट सोडला आणि बहुसंख्यांमध्ये तो रुजवण्यास घेतले तरी ते ही
एवढे कठीण आहे की ते 'जवळ जवळ अशक्य' च्या जवळ जावून पोहचते. अश्यामुळेच ते तत्व प्रत्येकात
सोडा परंतु बहुजनांत मुरवण्याचा द्रोणागिरी पर्वत उचलण्याचा ध्यास घेणे म्हणजे मोठा
तापचं आहे. दुसरी बाजू म्हणते की स्वातंत्र, समता आणि बंधुत्व हे तत्व प्रस्थापित झाल्याखेरीज
समाजाचा विकास रखडलेला राहतो. जनमाणसात ह्या तत्वाची भावना नसली किंवा ते ह्या तत्वाने
चालत नसले तर विकास होणे शक्य नाही. म्हणजेच स्वातंत्र, समता आणि बंधुत्व रुजवण्याचा
पर्वत कोणीतरी उचलणे आवश्यक होऊन, मोठी अडचणीची परिस्थिती उभी राहते. उभय दोन बाजूंपैकी
दुसरी आवश्यक असली तरी; पहिली दुसरीवर जड आहे ! हे कोणासही नाकबूल होणार नाही. त्यामुळे
न उलगडणारी कोंडी तयार झाली असा निष्कर्ष निघतो. परंतु असा निष्कर्ष काढण्यास आपण घाई
करीत आहोत असे मला वाटते.
स्वातंत्र,
समता आणि बंधुत्व बहुसंख्यांमध्ये रुजवणे जवळ जवळ अशक्य असले तरी ते त्या बहुजनांत
प्रस्थापित करता येऊ शकते. रुजवणे आणि प्रस्थापित करणे यात मी फरक करतो. 'रुजवणे' म्हणजे
प्रबोधनातून ते लोकांच्यात अंतर्भूत करणे आणि 'प्रस्थापित करणे' म्हणजे शासनाकडून ते
कार्यरत करून घेणे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते तत्व प्रस्थापित करण्याची प्रक्रिया
पूर्ण झाल्याचे सांगितली जाते. परंतु ते खरंच पूर्ण झालं की कसे? ह्यासंदर्भात संभ्रम
आहे. किंबहुना आताचे समाजजीवन आणि म्हणून शासन-प्रशासन यांचे निरीक्षण केल्यास, असे
काही प्रस्थापित नाही असा न्यायनिवाडा देण्यास हरकत नाही. म्हणजे ते तत्व प्रस्थापित
करणे फुले आंबेडकरी आंदोलनाचे प्रथम कर्तव्य ठरते.
स्वातंत्र,
समता आणि बंधुत्व हे तत्व दोन पद्धतीने प्रस्थापित केले जाऊ शकते.
पहिली
पद्धत आहे की शासक वर्गात -ज्यांच्या प्रभावाने शासन चालते- ते रुजवणे. शासक वर्ग आणि
शासन ह्या दोन वेगवेगळ्या संस्था आहेत. मानव जातीने जेव्हा पासून समाज जीवनात राहायचे
सुरु केले आहे, तेव्हापासूनच ह्या दोन्ही संस्था अस्तित्वात आहेत. शासक वर्ग अश्या
बुद्धिमान मानवांचा समूह असतो ज्यांच्या विचार करण्याच्या आणि निरनिराळ्या सिध्दांताच्या
साहाय्याने मानव जीवन उत्क्रांत होते. जगाच्या पाठीवर कोणताच असा देश सापडणार नाही
जेथे अश्या शासक वर्गाच्या प्रभावाने समाज आणि आजकाल; शासन चालत नाही. तसेच शासन म्हणजे
अशी एक व्यवस्था जे विविध नियम-कानून स्वरूपातून सामान्य माणसांवर प्रशासन करते. एखादी
गोष्ट लागू करायची असेल तर शासनाला ती फार कमी कालावधीत सर्व नागरिकांवर लागू किंवा
प्रस्थापित करता येते. आता शासन जर शासक वर्गाच्या प्रभावाने चालत असेल तर आणि स्वातंत्र,
समता आणि बंधुत्व शासक वर्गात रुजलेले असले तर ते तत्व सगळीकडे प्रस्थापित असलेले आढळून
येईल. आणि जर ते आढळून येत नसेल तर शासक वर्ग त्या विचाराचा नाही असा ठाम निष्कर्ष
काढण्यास कोणतीच हरकत असू शकत नाही. म्हणून पहिल्या पद्धतीप्रमाणे प्रथमतः ते तत्व
शासक वर्गात रुजवणे त्याचा उपाय आहे.
भारत
देशात हा शासक वर्ग कोण राहिला आहे, हे कोणालाही लपलेले नाही. बहुसंख्येने ब्राम्हण
आणि ब्राह्मण्याने ग्रासलेले ब्राह्मणेतर हेच प्रामुख्याने आणि जवळ जवळ सर्व काळ शासक
वर्ग राहिले ह्यात कोणालाही शंका नाही. त्यांच्यात स्वातंत्र, समता आणि बंधुत्व रुजवणे
शक्य नाही. कारण स्वातंत्र, समता आणि बंधुत्व हे तत्व ब्राम्हण्यत्वपेक्षा नुसत वेगळं
नसून विरुद्ध आहे. ब्राम्हण्यत्व सोडून स्वातंत्र, समता आणि बंधुत्व ते अंगिकारणार
नाहीत, कारण ब्राम्हण्यत्व सोडले तर सर्व संसाधने हातचे निघून जातील. असे कोणतेच तत्व,
जे ब्राम्हण्यत्वाला नाकारतात, ते न स्वीकारणे हे त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर आहे.
म्हणजे
स्वातंत्र, समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्याकरिता आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा विचार
करावा लागेल.
स्वातंत्र,
समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्याकरिता दुसरी पद्धत म्हणजे, जे कोणी ह्या तत्वाचे
पालनकर्ते, चाहते, आणि ज्यांच्यात ते बऱ्यापैकी रुजलेले आहे त्यांनी शासक वर्ग होणे.
पण हे वाटते तेवढे सोपे नाही. तुम्ही कितीही स्वातंत्र, समता आणि बंधुत्व प्रस्थापित
करण्याचे चाहते असले तरी शासक वर्ग बनण्याचा मार्ग खडतर आहे. त्यासाठी रात्रीचा दिवस
करून विचारधारेचा नुसताच अभ्यास नाही तर त्याचे विश्लेषण सुद्धा करावे लागेल. त्यानंतर
तुमच्या समूहाची हुशारी आणि बुद्धिमत्ता जगाला पटवून द्यावी लागेल. तसे करण्यास काय
काय आवश्यक आहे ह्याची जाण असावी लागेल. मिळेल त्या माध्यमातून बुद्धिमत्तेचे प्रभावी
प्रदर्शन करून, समस्यांचे सर्वसमावेशक समाधान निर्माण करावे लागेल.
उल्लेखित,
सगळे नाही; परंतु त्यातील प्रमुख आहे.......
-प्रशांत रमेश
महाले
९०७५०१९९१२
महात्मा ज्योतिबा फुले - जीवन सारांश
· संपूर्ण नाव - ज्योतिराव गोविंदराव फुले , आईचे नाव - चिमणाबाई (ज्योतिराव नऊ महिन्याचे असतांनाच आईचा मृत्यू).
· मूळ आडनाव - गोर्हे
· १८४१, वयाच्या १४ व्या वर्षी, 'गफहार बेग मुन्शी' ह्या मुस्लिम हितचिंतकांच्या आणि मि. लेजीट ह्या इंग्रज मित्राच्या सल्याने गोविंदरावांनी ज्योतिरावांना शाळेत घातले.
· १८४७ पर्यंत सात बुके (वर्ग) शिकले.
· निरनिराळे ग्रंथ विशेषकरून 'इंग्रजी ' वाचण्याचा नाद लागला.
· एका ब्राम्हण मित्राच्या लग्नाला गेले आसता ' शूद्र असूनही ब्राम्हणाच्या बरोबरीने वरातीत कसा चाललास?' म्हणून अपमानास्पद वागणूक मिळाली.
· १८४८ सालच्या आरंभी पुण्याच्या बुधवार पेठेत, ‘भिडे’ वाड्यामध्ये मुलींची शाळा सुरु केली. (बहुतेक ही देशातील मुलींची पहिली शाळा आहे.)
· धर्मवेड्या लोकांनी मुलींची शाळा काढून धर्म भ्रष्ट केला असा बोभाटा पसरविला. परंतु शाळेतील मुलींची संख्या झपाट्याने वाढत होती.
· शाळेचे काम झेपेना म्हणून नवीन शिक्षक (फुकट काम करणारा) शोधून पहिला, मात्र कोणी मिळाले नाही. शेवटी पत्नी सावित्रीबाईंना घरीच शिकवून, शाळेत शिक्षिका म्हणून नेमले.(बहुतेक ह्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत.)
· धर्मवेड्या लोकांकडून आणि ब्राम्हणांकडून, शाळेत कामावर जातांना सावित्रीबाईंना त्रास देण्यात आला. अंगावर दगड धोंडे मारले जात म्हणून ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या स्वरक्षणार्थ सोबत पट्टेवाला ठेवला.
· १८५१ साली पुण्याच्या नाना पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरु केली. 'या आधी मुलींची शाळा काढून धर्म भ्रष्ट केला आता महार मांगांसाठी शाळा काढून अजून धर्म भ्रष्ट केला' असे म्हणून टीकेचा मारा सहन करावा लागला.
· एका रात्री बारा वाजेच्या सुमारास दोन मारेकरी जोतिरावांना मारण्याच्या बेताने घरात शिरले,ज्योतिराव जागेच असल्याने मारेकऱ्यांचे प्रबोधन करून त्यांचे मन पालटवले. दोन्ही पुढे ज्योतिरावांचे एकनिष्ठ झाले.
· १८५१ साली आपली विहीर आणि हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
· १८६३ साली स्वखर्चाने वाडा (बालहत्याप्रतिबंधक गृह) बांधला जेणेकरून ज्या विधवा गरोदर राहून आपल्या बाळाला मारून टाकत असत त्यांना गुप्तपणे येऊन बाळंत होऊन बाळ ठेवून जाता येईल, ह्याकरिता घरासमोर तशी पाटी लावली. ह्या घराचा ( वाड्याचा ) नंबर त्यावेळी ३९५ होता.
· १८६४ साली पुण्याच्या गोखल्यांच्या वाड्यात शेणवी जातीतील रघुनाथ जनार्दन आणि नर्मदा ह्यांचा महाराष्ट्रातील पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
· १८६५ साली काशीबाई नावाच्या एका ब्राम्हण विधवेने बालहत्याप्रतिबंधक गृहात एका बाळाला जन्म दिला. पुढे जाऊन ज्योतिरावांनी ह्या मुलाला दत्तक घेतले. यशवंत नावाचा हा मुलगाच ज्योतिरावांचा एकमेव वारस आहे.
· १८६८ साली रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि १८७० साली शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहून प्रसिद्ध केला.
· १८७३ 'गुलामगिरी' ग्रंथ लिहून प्रसिद्ध केला.
· २३ सप्टेंबर १८७३ साली पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
· १८७६ साली रा. भालेकर आणि रा. रामचंद्र हरी शिंदे यांना पार्टनर करून 'पुणे कमर्शियल ऍण्ड काँट्रॅक्टिंग कंपनी' स्थापित केली. खडकवासला तलाव, मुठा नदीच्या पाटाचे बांधकाम, येरवड्याच्या पुलाच्या बांधकामाचा दगड आणि चुना, पुणे सातारा रस्त्यावरील डोंगरातील बोगदा कोरण्याचे काम इत्यादी पूर्ण केले.
· १८८२ साली टिळक आणि आगरकर यांचा रामशेठ उरवणे यांच्या मार्फत कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खटला चालल्याने, जमीन घेतला.
· १८८४ साली 'हंटर कमिशन' पुढे सक्तीचे शिक्षण करावे अशी साक्ष झाली.
· १८८४ साली पुणे येथे 'अनाथ विद्यार्थी वसतिगृह' सुरु केले.
· ११ मे १८८८ रोजी कोळीवाडा हॉल मध्ये भरलेल्या सभेत 'महात्मा' ही पदवी देण्यात आली.
· १८८८ साली पक्षाघाताने उजवा हात निकामी झाला. डाव्या हाताने लिखाण शिकून 'सार्वजनिक सत्यधर्म' हा ग्रंथ लिहला.
· ४ फेब्रुवारी १८८९ रोजी रा. ग्यानबा कृष्णाजी ससाणे यांच्या लक्ष्मीबाई नावाच्या कन्येशी यशवंताचा विवाह पार पडला.
· २७ नोव्हेंबर १८९० रोजी गुरुवारी रात्रीच्या २ वाजून २० मिनिटांनी (२८ नोव्हेंबर १८९०) देहावसान झाले.
संदर्भ
'महात्मा ज्योतिराव फुले - अल्प परिचय'
लेखक - पंढरीनाथ सिताराम पाटील.
Thursday, May 14, 2020
आम्ही
आम्ही अश्या एका ध्येयाने प्रेरित आहोत की, आज नाही तर काल ज्या एका गोष्टीची जाणीव भारत देशातील प्रत्येकाला नाही ; तरी बहुसंख्यानां होईल - की सर्व समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव प्रस्थापित केल्याखेरीज कोणाचेच हित साध्य होवू शकत नाही - त्या विचारधारेसाठी जे जे करणे आवश्यक आणि आमच्याकडून शक्य आहे ते ते जिद्दीने, चिकाटीने आणि अनुशासनात्मक पद्धतीने करायला हवे.
दृष्टीकोन
अखिल समाजात बंधुत्वाने प्रेरित समता आणि स्वातंत्र्याची प्रस्थापना करणे
कार्यक्रम
'समाजात स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे प्रस्थापित होणे अत्यंत आवश्यक आहे' ह्या विचारधारेच्या महामानवांचे साहित्य आणि विचार जनमानसात पसरविणे आणि आजच्या घडामोडींना त्यांच्या दृष्टिकोनातून प्रस्तुत करणे.
Dr. B. R. Ambedkar - Educational chronology
1. Elementary Education, 1902 in Satara, Maharashtra, India.
2. Matriculation, 1907, in Elphinstone High School, Bombay Persian etc.,
3. Inter 1909, in Elphinstone College,Bombay Persian and English
4. B.A, 1913, in Elphinstone College, Bombay, University of Bombay, Economics & Political Science
5. M.A, 1915 Majoring in Economics and with Sociology, History Philosophy, Anthropology and Politics asthe other subjects of study. (Received scholarship from Baroda sansthan)
6. Ph.D, 1917, Columbia University, USA conferred a Degree of Ph.D.
7. M.Sc, 1921 June, London School of Economics, London. (Great Briton) Thesis – ‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’
8. Barrister-at- Law 30-9-1920 Gray’s Inn, London Law (Great Briton)
(1922-23, University of Bonn in Germany - Spent some time in reading economics.)
9. D.Sc 1923 Nov. London School of Economics, London.
10. L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York, USA For achievements, Leadership and authoring the constitution of India
11. D.Litt (Honoris Causa) 12-1-1953 Osmania University, Hyderabad.
प्रस्तावना
"सब्बे सत्ता
सुखी होन्तु, सब्बे होन्तुच खेमिनो
सब्बे भद्रानी पस्सन्तु,
मा किन्चि दुक्ख मा गमा"
"सर्व
प्राणिमात्र सुखी होवोत, क्षमाशील होवोत ,
सुसभ्य
होवोत. तेव्हाच ते दुःखापासून मुक्त होतील"
मी असे ऐकले आहे की बुद्धाच्या काळात
एकदा, म्हणे एका विधवा स्त्रीचा, चार पाच वर्षाचा मुलगा, सर्पदंशाने मरण पावला. एकुलत्या
एक मुलाच्या अकाली मृत्यूने, कष्टी झालेल्या त्या माउलीचे दुःख अनावर झाले. सर्वांनीच
हळहळ व्यक्त केली. त्यातील काहींनी तिला मार्ग सांगितला. ते म्हटले,
"आम्ही असे ऐकले आहे की भगवान बुद्ध
नावाच्या एका मानव श्रेष्ठ व्यक्तीला साक्षात्कार झाला आहे. त्याचे खूप नाव घेतले जाते.
असे म्हणतात, की तो मानवातले दुःख नष्ट करतो. तो सम्यक संबोधी; आता आपल्या गावाच्या
सीमेपाशी एका झाडाखाली ‘समाधि’ अवस्थेत बसला आहे. तू त्याच्याकडे जा. कदाचित, तो तुझ्या
मुलाला पुन्हा जिवंत करून देईल."
एवढे ऐकल्यावर त्या विधवेने गावाची
सीमा गाठली. झाडाखाली बसलेल्या गौतमाच्या पायाशी मुलाचे प्रेत ठेवले. आणि म्हणाली,
"हे महात्म्या ! माझ्या मुलाचा अकाली
मृत्यू झाला आहे. माझ्या विधवेचा तो एकुलता एक सहारा होता. तू दुःखाचे हरण करणारा महान
बुद्ध आहेस, असे मी ऐकले आहे. तू तुझ्या साक्षात्काराने माझ्या मुलाला पुन्हा जिवंत
करून, माझे दुःख हरण कर."
भगवान बुद्ध म्हणाले,
"होय ! ग्रामिणी तू ऐकलेस ते एकदम
खरे आहे, की मी दुःखाचे निवारण करतो. मात्र, तुझ्या मुलाला जिवंत करण्यासाठी मला काही
साधन सामुग्रीची आवश्यकता आहे. तेवढी तू आणून दे, मग लगेच मी तुझ्या मुलाला जिवंत करतो."
"काय साधन सामुग्री पाहिजे? मला
लवकर सांगा मी ती लगेचच तुम्हाला आणून देते." ती विधवा म्हणाली.
बुद्ध म्हटले,
"तू फक्त एवढेच कर, की गावात जावून
अश्या एका घरातून एक मूठभर मोहरी घेऊन ये, ज्या घरात असा आतापर्यंत कोणाचाच अकाली मृत्यू
झाला नाही. तो पर्यंत तू तुझ्या मुलाचे प्रेत इथेच माझ्याजवळ ठेवून जा."
" होय महाराज ! मी लवकरच ते घेऊन
येते."
असे म्हणून ती विधवा गावात गेली. दिवसभर,
ती प्रेत्येक घरी हिंडली; परंतु प्रत्येकाने तिला त्यांच्या घरात कसा अकाली मृत्यू
झाला त्याची कहाणी सांगितली. कोणाच्या घरात एक मृत्यू तर कोणाच्या घरात दोन मृत्यू
तर कोणाच्या घरात दोनपेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे तिने ऐकले. म्हणून तिला मोहरी मिळाल्या
नाही. सर्वांच्या कहाण्या ऐकून मात्र तिला याची जाणीव झाली, की अश्या परिस्थितीत सापडलेली
ती पहिली नाही. काही कहाण्या तर तिने अश्याही ऐकल्या, ज्या ऐकून तिचे दुःख काहीच नाही
असे तिला वाटले. शेवटी ती बुद्धा जवळ परत आली. म्हणाली,
"हे सम्यक संबुद्धा ! मला दुःख
मुक्त कर. मी तुझी साधन सामुग्री आणण्यात अयशस्वी
झाले आहे."
बुद्ध म्हणाले,
"अशी कोणतीही साधन सामुग्री नाही.
मी तर तुला फक्त ही जाणीव करून देत होतो, की तुझ्या मुलाचा असा मृत्यू झाल्यावर, कोणाच्यानेच
त्याला पुन्हा जिवंत करणे शक्य नाही. ही गोष्ट
तुला समजण्यासाठी, आजपर्यंत असे असंख्य समयी घडले आहे, ह्याची जाणीव आवश्यक होती. तुझ्या
मुलाला जिवंत करणे तर मला शक्य नाही. पण त्यामुळे जे दुःख झाले आहे, ते मी नष्ट करू
शकतो."
त्यावर ती विधवा म्हणाली,
"कृपया तसे करा".
त्यानंतर भगवानांनी तिला त्यांचा धम्म
सांगितला. ते एकूण ती म्हणाली,
"साधू ! साधू ! साधू ! हे नरोत्तमा मी तुझा धम्म समजले.
कृपया मला तुमच्या संघात सामील करून घ्या."
आणि तिला बुद्धांनी संघात सामील करून घेतले.
मला प्रश्न असा पडला, की बुद्धाने तिला
धम्म म्हणून असे काय सांगितले ज्यामुळे तिचे दुःख हरण झाले?. जो कोणी येऊन बुद्धाचा
धम्म त्यांच्याकडून ऐकत असे तो 'साधू ! साधू ! साधू !' अर्थात 'उत्तम ! अतिउत्तम !
सर्वोत्तम !' असे म्हणून, लगेच धम्म अनुसरण्यास सुरु करत असे. मग तो धम्म नक्की काय
होता? हा प्रश्न मनात तयार झाला.
आजची स्थिती मात्र खूप बिकट आहे. मानव इतिहासाच्या, कोणत्याही काळात मानवात माजलेल्या,
अमानवी कृत्यांचे अवलोकन केल्यास, मानवाला ‘मानव’ म्हणावे कि ‘अमानव’, असा प्रश्न निर्माण
होतो. आज कालचीच उदाहरण घ्या. प्रत्येक एका सेकंदाला जगभरात कमीत कमी १०० असे अमानवी
कृत्ये पार पडतात, जे माणसाला ‘मानव’ म्हणून शोभणारे बिलकुल नाही . मानवांच्या अमानवी
कृत्यांचा पाढा वाचल्यास, तो असंखत्वाचा पाढा आहे असे तुम्हाला जाणवेल.
म्हणून बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला.
ह्या अभ्यासात मला डॉ. आंबेडकरांच्या बुद्धाकडे बघण्याच्या दृष्टीकोनाची फार मदत झाली.
त्या वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रस्तुत पुस्तक तयार झाले.
त्या उदात्त हेतूने प्रेरित झाल्यामुळे
आणि मानव जातीच्या कल्याणाचा मार्ग, जो २५०० वर्षांपूर्वी शोधण्यात आला आणि सांगितला
गेला, जो एवढ्या कालावधी नंतर त्याच्या मूळ स्वरूपापासून दूर गेला आहे, तो समजून घेतला.
तेव्हा मला वाटले,
काय
करू आता धरूनिया भीड, निशंक हे तोंड वाजविले
नाही
जगी कोणी मुकीयांची जाण, सार्थक लाजून नव्हे हित.
-
संत तुकाराम
आता
भीती धरून काय करू, म्हणून बोलायला सुरु केले
या
जगात वंचितांची जाण असलेले कोणी नाही, म्हणून
सार्थक लाजणे आता हिताचे नाहीं.
-
संत तुकाराम
पुस्तकात
वापरलेली मराठी भाषा फार साहित्तिक नाही. मला ती माहीतही नाही. मराठी शुद्धलेखनाच्या
काही त्रुटी राहून गेल्या असण्याची शक्यता नाकारता आली नसती. परंतु ते डोळ्यात तेल
घालून तपासण्याची आणि तसेच इतर आवश्यक शब्दांचे बदल करण्याची, मोठी जबाबदारी माझे वडील
श्री. रमेश धोंडू महाले (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जि. प. जळगाव) यांनी पार पडली;
त्यांचे आभार. मराठी माध्यमातून न शिकल्यामुळे
माझे झालेले नुकसान, भरून निघणार नाही; ह्याची आता जाणीव होते. पुस्तक लिहितांना ज्या
संदर्भांची परत फेड करता येणार नाही; अशी मदत झाली, त्या संदर्भांची यादी दिली आहे.
त्यांचे मनपूर्वक आभार.
- प्रशांत रमेश महाले.
पुणे
दि. १४ एप्रिल २०२०
'धम्म' पुस्तकातील प्रस्तावना
Subscribe to:
Posts (Atom)
Muknayak: आत्मनिर्भरप्रधानमंत्रीकहते है 'आत्मनिर्भर हो जाओ...
Muknayak: आत्मनिर्भर प्रधानमंत्रीकहते है 'आत्मनिर्भर हो जाओ... : आत्मनिर्भर प्रधानमंत्री कहते है 'आत्मनिर्भर हो जाओ'। कु...